बातम्या

बाळकृष्ण विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज, नंदेश्वर, परीक्षा केंद्र  सुरु

Balkrishna Vidyalaya and Junior College


By Administrator - 3/24/2026 3:46:35 PM
Share This News:



बाळकृष्ण विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज, नंदेश्वर, परीक्षा केंद्र  सुरु

कोल्हापूर दि.24 :   श्री. बाळकृष्ण शिक्षण संस्था नंदेश्वर, मंगळवेढा, सोलापूर, येथील शिक्षण संस्थे मार्फत श्री.बाळकृष्ण विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज, नंदेश्वर ही शाळा चालवली जाते. सदर शाळेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माद्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्या मार्फत इयत्ता 10 वी करिता परीक्षा केंद्र क्र. 3184 अन्वये देण्यात आले आहे. सदरचे परीक्षा केंद्र शाळे मार्फत व्यवस्थित चालविले जात होते, सबब बोर्डाने सदर शाळेला 12 वी च्या परीक्षा केंद्र सदर शाळेला दिला. सदर शाळेमध्ये परीक्षा केंद्राकरिता लागणारी सर्व निकषे ही पूर्ण होती.

दि. 13/2/2025 रोजी सदर शाळेवर मराठी चा 12 वी चा पेपर सुरु असताना, सदर शाळेवर परीक्षा फ्लॅइंग स्वड ने भेट दिली होती. त्यावेळी सदर शाळेमधील दोन मुलांच्या कडे कॉपी सापडली होती.

सबब, सदर  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने शाळेच्या परीक्षा केंद्राची दि. 11/12/2025 रोजीच्या आदेशाने परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द केली. सदर आदेशावर नाराज होऊन श्री. बाळकृष्ण शिक्षण संस्थेने, ॲडव्होकेट हितेश राणीगा (वकील ) यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर यांच्या कोर्टा मध्ये रिट्पिटिशन दाखल केले होते. सदर रिट्पिटिशन मध्ये मा. न्यायालय यांनी जर परीक्षा केंद्रावर कॉपी झाली असेल आणि सदर प्रकरणात जर संबंधित परीक्षा केंद्रशाळेचा काही  सहभाग नसेल, तर शाळेचे परीक्षा केंद्र कायमचे रद्द करणे चुकीचे होईल असा निर्णय देऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांनी, दिलेला निर्णय रद्द केला. सदर शाळेच्या वतीने सिनिअर ॲड. गनबावले व ॲड. हितेश राणीगा यांनी काम पहिले.


बाळकृष्ण विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज, नंदेश्वर, परीक्षा केंद्र  सुरु
Total Views: 11