बातम्या

मेतकेतील बाळूमामा मंदिर दोन दिवस बंद; नवरात्रोत्सवापूर्वी स्वच्छतेची तयारी

Balumama Temple in Metke closed for two days

By nisha patil - 3/10/2026 1:55:03 PM
Share This News:

मेतकेतील बाळूमामा मंदिर दोन दिवस बंद; नवरात्रोत्सवापूर्वी स्वच्छतेची तयारी

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता व आवश्यक तयारी करण्यासाठी मेतके, तालुका कागल येथील सद्गुरू बाळूमामा मंदिर मंगळवार, ६ ऑक्टोबर आणि बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मंदिरासोबतच भक्तनिवास आणि अन्नछत्रही बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी या दोन दिवसांत मंदिरात दर्शनासाठी येऊ नये आणि ट्रस्टच्या निर्णयास सहकार्य करावे, असे आवाहन श्री सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील कौलवकर, अध्यक्ष आर. डी. पाटील, दयानंद पाटील, बळिराम मगर, देवाप्पा पुजारी, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

मेतकेतील बाळूमामा मंदिर दोन दिवस बंद; नवरात्रोत्सवापूर्वी स्वच्छतेची तयारी
Total Views: 17