बातम्या

*बामणादेवी पतसंस्थेकडून शाळा वाचवा, शिक्षणवाचवा आंदोलनासाठी पाच हजारचा लढा निधी

Bamnadevi Credit Society contributes a struggle fund


By nisha patil - 9/28/2026 11:09:15 PM
Share This News:



*बामणादेवी पतसंस्थेकडून शाळा वाचवा, शिक्षणवाचवा आंदोलनासाठी पाच हजारचा लढा निधी

*आजरा(हसन तकीलदार)- बामणादेवी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था,जेऊर ता. आजरा यांच्याकडून महाराष्ट्रात सरकारी व अनुदानित शाळा वाचवण्यासाठी ५ ऑक्टोबर पासून मुंबई आझाद मैदान येथे सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी रुपये पाच हजारचा निधी आज लढ्याचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांच्याकडे जमा केला.
 

खेड्यापाड्यातील,वाड्या वस्तीवरील शाळा वाचल्या पाहिजेत दलित, आदिवासी, बहुजन कष्टकरी शेतकरी यांच्या मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजेत, शिक्षणाचे खाजगीकरण होता कामा नये, अशी भूमिका घेऊन महाराष्ट्रात हे आंदोलन उभे राहत आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उतरले आहेत. मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनात जेऊरकर ग्रामस्थ आणि  बामणादेवी पतसंस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.बामणादेवी पतसंस्थेसारख्या छोट्या संस्थेने दिलेली ही मदत शिक्षण हक्काच्या चळवळीला बळ देणारी आहे.

त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होणार याची खात्री आम्हाला मिळाली आहे असे म्हणायला हरकत नाही. खेड्यातली एक छोटी संस्था शिक्षणाच्या चळवळीसाठी मदत करते हे अत्यंत महत्वाचे आहे. असे कॉ.संपत देसाई म्हणाले.
 

संस्थेचे संचालक दशरथ घुरे,मॅनेजर तानाजी मिसाळ याबरोबर शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचचे कॉ.संजय तरडेकर,कॉ.प्रकाश मोरुसकर, कॉम्रेड दत्ता कांबळे, मारुती पाटील, कॉ शांताराम पाटील, नामदेव फगरे, विजय पाटील यांच्यासह शाळा वाचवा शिक्षण वाचवा म्हणजे कार्यकर्ते उपस्थित होते


*बामणादेवी पतसंस्थेकडून शाळा वाचवा, शिक्षणवाचवा आंदोलनासाठी पाच हजारचा लढा निधी
Total Views: 65