बातम्या
15 ऑगस्ट रोजी मांसाहार विक्रीवर बंदी...?
By nisha patil - 8/13/2025 3:02:20 PM
Share This News:
15 ऑगस्ट रोजी मांसाहार विक्रीवर बंदी...?
मांसाहार बंदीवरून राऊतांचा हल्लाबोल; “महाराष्ट्राला नामर्द बनवत आहात”
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महाराष्ट्रात मांसाहार विक्रीबंदीच्या निर्णयावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाला खासदार संजय राऊत यांनी जोरदार विरोध दर्शवत महायुती सरकारवर टीका केली. त्यांनी 15 ऑगस्ट हा धार्मिक नव्हे तर शौर्याचा दिवस असल्याचे सांगत, “मांसाहारावर बंदी घालून महाराष्ट्राला नामर्द बनवत आहात, हे फतवे मागे घ्या,” असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. तसेच, इतिहासातील दाखले देत शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे आणि सैन्य मांसाहार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
15 ऑगस्ट रोजी मांसाहार विक्रीवर बंदी...?
|