विशेष बातम्या
कागलमध्ये ‘बानगे’ नवा जिल्हा परिषद गट, करवीरमध्ये सर्वाधिक प्रभाग
By nisha patil - 7/18/2025 4:51:06 PM
Share This News:
कागलमध्ये ‘बानगे’ नवा जिल्हा परिषद गट, करवीरमध्ये सर्वाधिक प्रभाग
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नव्या प्रभाग रचनेत कागल तालुक्यात सहावा ‘बानगे’ हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ तयार झाला आहे. या नव्या रचनेत काही गावांची अदलाबदल झाली असून एक जिल्हा परिषद सदस्य आणि दोन पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढली आहे.
दरम्यान, करवीर तालुक्यात सर्वाधिक १२ जिल्हा परिषद गट व २४ पंचायत समिती गणांची निर्मिती करण्यात आली आहे. पाडळी खुर्द हा नवा जिल्हा परिषद गट तयार झाला असून पाडळी खुर्द आणि शिरोली दुमाला हे दोन नवीन पंचायत समिती गण झाले आहेत.
या प्रभाग रचनेत लोकसंख्येला प्राधान्य दिल्याने भौगोलिक सलगतेकडे मात्र काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याची चर्चा सुरू आहे.
कागलमध्ये ‘बानगे’ नवा जिल्हा परिषद गट, करवीरमध्ये सर्वाधिक प्रभाग
|