व्यवसाय
बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटची दुसरी शाखा ३०ऑक्टोबर रोजी उद्घाटनास सज्ज
By nisha patil - 10/29/2025 6:10:52 PM
Share This News:
बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटची दुसरी शाखा ३०ऑक्टोबर रोजी उद्घाटनास सज्ज
कोल्हापूर / प्रतिनिधी — दसरा चौकातील गेल्या १५ वर्षांपासून चटकदार शाकाहारी पदार्थांनी कोल्हापूरकरांची मनं जिंकणाऱ्या बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटची दुसरी शाखा आता फुलेवाडी दत्त मंदिर परिसरात सुरू होत आहे.
या नव्या “बांसुरी फाईन डाईन” रेस्टॉरंटचे उद्घाटन गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार असून, या वेळी हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानभाग, उपाध्यक्ष सिध्दार्थ लाटकर, माजी अध्यक्ष उज्वल नागेशकर, आनंद माने, किडाई अध्यक्ष के. पी. खोत आणि भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळा सायं. ६ वाजता पार पडणार आहे.
या शाखेत पंजाबी, महाराष्ट्रीयन थाळी, तंदूर, चायनीज, कॉन्टिनेन्टल, डेझर्टस असे विविध खाद्यपदार्थ माफक दरात उपलब्ध असतील. तसेच ए.सी. आणि ओपन गार्डन, बैंक्वेट हॉल, चेंजिंग/फीडिंग रूम अशा आधुनिक सोयींसह कौटुंबिक जेवण, वाढदिवस किंवा कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण ठरणार आहे.
रेस्टॉरंट ३१ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी खुले होणार असून, कोल्हापूरकरांनी नवीन शाखेला भेट द्यावी, असे आवाहन सौ. अनुजा मेहेंदळे यांनी केले आहे.
बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटची दुसरी शाखा ३०ऑक्टोबर रोजी उद्घाटनास सज्ज
|