बातम्या

आजऱ्यात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे जल्लोषमय आगमन

Bappas joyful arrival in the morning amidst the sound of drums and cymbals


By nisha patil - 8/28/2025 12:31:44 PM
Share This News:



आजऱ्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे जल्लोषमय आगमन...

पोलिसांचा चोख बंदोबस्त – वाहतुकीला अडथळा नाही

 आजरा (हसन तकीलदार) : गणेशचतुर्थीनिमित्त आजऱ्यात घरोघरी व विविध मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे थाटामाटात स्वागत झाले. पारंपरिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशांचा नाद आणि भक्तीभावाने बाप्पाचे आगमन सुरू आहे. कुंभारगल्लीतून मूर्ती डोक्यावर घेऊन जाताना "गणपती बाप्पा मोरया" च्या जयघोषात भक्तीचा महासागर अनुभवायला मिळाला. घराघरात, गल्लोगल्ली आणि मंडळांत उत्सवमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ फुलून गेली होती. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण पारंपरिक पोशाखात बाप्पाच्या स्वागतामध्ये सहभागी झाले. गणेशोत्सवामुळे आजऱ्यात आनंद, भक्ती आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळत आहे.गणेशोत्सव काळात गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आजरा अन्याय निवारण समितीच्या निवेदनानंतर पोलिसांनी वाहतुकीसाठी सुयोग्य नियोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार्किंग व्यवस्था व मार्गक्रमण सुरळीत ठेवण्यात आले. यामुळे गर्दी असूनही कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही. उत्सवी जल्लोषासोबत शिस्तबद्ध बंदोबस्तामुळे वातावरण आनंदी व सुरक्षित राहिले.


आजऱ्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे जल्लोषमय आगमन...
Total Views: 55