बातम्या
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 108 वी जयंती उद्या उत्साहात साजरी
By Administrator - 8/6/2026 9:51:20 PM
Share This News:
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 108 वी जयंती उद्या उत्साहात साजरी
कोल्हापूर, दि. 8 जून : “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा पोहोचविणारे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक, संवर्धक, ज्ञानतपस्वी आणि द्रष्टे समाजचिंतक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 108 वी जयंती मंगळवार, दि. 9 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे साजरी करण्यात येणार आहे.
या जयंती समारंभास खासदार धनंजय महाडिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रसिद्ध लेखक व वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांचे ‘शिक्षण : काल, आज आणि उद्या’ या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, तसेच 13 जिल्ह्यांतील 410 शाखांमधून मोठ्या संख्येने गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात मुख्याध्यापकांसाठी विशेष चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षणप्रेमी, अभ्यासक, विचारवंत, गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले आहे.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 108 वी जयंती उद्या उत्साहात साजरी
|