बातम्या

बारामतीचा विकास पाहून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शहाही अचंबित झाले होते

Baramati


By nisha patil - 4/20/2026 1:36:55 PM
Share This News:



*बारामतीचा विकास पाहून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शहाही अचंबित झाले होते*

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरव उद्गार

स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार विकासावर प्रेम करणारे नेते

बारामती, दि. १८:बारामतीचा विकास पाहून दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा हे अचंबित झाले होते, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार हे विकासावर प्रेम करणारे महान नेते होते. त्यांनी उभी आहेच विकास कामांसाठीच खर्ची घातली, असेही ते म्हणाले.

 भाषणात मंत्री  मुश्रीफ पुढे म्हणाले, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित बारामती व माळेगाव येथील जाहीर सभांमधून मुश्रीफ बोलत होते.

 भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांच्या अचानक जाण्याने पोटनिवडणूक लागेल आणि त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला यावे लागेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु नियतीसमोर कोणाचंच काहीच चालत नाही. दादांच्या अपघाती जाण्याने आपण सर्वजण पोरके झालो आहोत. दादा नेहमीच मोठ्या अभिमानाने सांगत असत की, मी अर्ज भरल्यानंतर फक्त शेवटच्या समारोपाच्या प्रचार सभेला जातो आणि माझे बहाद्दर कार्यकर्ते मला नेहमीच लाखाहून अधिक मताधिक्याने मोठ्या जिद्दीने निवडून आणतात.

 मुश्रीफ पुढे म्हणाले, एखाद्या नेत्यासमोर विकासाचे व्हिजन असेल तर तो कशा पद्धतीने कायापालट करू शकत शकतो, हे स्वर्गीय अजितदादा यांनी सिद्ध करून दाखवले होते. ते स्वच्छता, नीटनेटकेपणाबद्दल सदैव आग्रही असायचे. बांधकाम क्षेत्रातील तर त्यांना फार मोठी माहिती होती.

विशेषता झाडांवर त्यांचे फार प्रेम होते. विकासकामांच्या दर्जा आणि गुणवत्तेसाठी ते पहाटेच विकासकामांच्या ठिकाणी पोहोचत. आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये ७२ टक्क्यांपर्यंतच पर्यंतच मतदान व्हायचे. परंतु; या निवडणुकीत सबंध देशातील उच्चांकी मताधिक्याचा एक नवा विक्रम नोंदवा.

पुरोगामी नेतृत्व.......!

स्वर्गीय अजितदादा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे पाईक होते.

स्वर्गीय कै. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या विचारांवर चालणारा कार्यकर्ता म्हणून सबंध राज्यभर त्यांची ओळख ख्याती होती. कितीही कडक बोलले तरी ते लोकांवर प्रेम करत असत. त्या स्वभावातूनच त्यांनी आमच्यासारखी असंख्य जीवाभावाची माणसं गोळा केली आणि सबंध राज्यभर त्यांनी कार्यकर्ते निर्माण केले. 

 नगराध्यक्ष सचिनसेठ सातव, सुयोग सातपुते, शकील सय्यद, शिवराजराजे जाधव, जयदीप तावरे, वैभव खंडाळे, राम खरात आदी प्रमुख उपस्थित होते.

*बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या प्रचारार्थ बारामती व माळेगाव येथील जाहीर सभांमध्ये बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व इतर मान्यवर.*

 


बारामतीचा विकास पाहून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शहाही अचंबित झाले होते
Total Views: 20