बातम्या

मुसळधार पावसातही वीज दुरुस्तीसाठी झुंज; वायरमन मयूर यांचे कौतुक.

Battling to repair power lines amidst torrential rain


By Administrator - 8/7/2026 6:36:29 AM
Share This News:



मुसळधार पावसातही वीज दुरुस्तीसाठी झुंज; वायरमन मयूर यांचे कौतुक.

दोडामार्ग : शुभम गवस  : पिकुळे शेळपीवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे वीजवाहिनीवर झाडे व फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत प्रतिकूल परिस्थितीत दुरुस्तीचे काम करत आहेत.
 

रविवारी रात्री सुमारे ९.३० वाजता सुरू असलेल्या मुसळधार पावसात रेनकोट घालून वायरमन मयूर यांनी झाडाझुडपांमध्ये अडकलेल्या वीजवाहिन्यांपर्यंत पोहोचून दुरुस्तीचे काम हाती घेतले. अंधार, पाऊस आणि धोकादायक परिस्थिती असूनही त्यांनी काम सुरू ठेवले असून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 

या धाडसी कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, "पावसाची तमा न बाळगता नागरिकांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेषतः वायरमन मयूर यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


मुसळधार पावसातही वीज दुरुस्तीसाठी झुंज; वायरमन मयूर यांचे कौतुक.
Total Views: 216