बातम्या

नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज राहा – समरजितसिंह घाटगे

Be ready for the Municipal and Zilla Parishad elections


By nisha patil - 6/13/2025 3:22:15 PM
Share This News:



नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज राहा – समरजितसिंह घाटगे
 

बोरवडे (ता. कागल) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वर्धापन दिनानिमित्त बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांना आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका ताकतीने लढवण्याचे आवाहन केले. पराभवाने खचून न जाता आम्ही जनतेसाठी नव्या जोमाने काम करत आहोत, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी संभाजी फराकटे यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा विश्वासही व्यक्त केला. बोरवडे, कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघात कोट्यवधींचा निधी खेचून आणल्याचा उल्लेख करत घाटगे यांनी सर्वसामान्यांसाठी प्रामाणिक काम करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाला सरपंच जयश्री फराकटे, अभिषेक पाटील, डॉ. महादेव साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज राहा – समरजितसिंह घाटगे
Total Views: 88