बातम्या
कोल्हापुरात रक्षाविसर्जनावेळी तिरडीच्या काठ्यांनी मारहाण; स्मशानभूमीत धुमश्चक्री
By nisha patil - 11/27/2025 5:19:08 PM
Share This News:
पंचगंगा स्मशानभूमीत रक्षाविसर्जनाला उशिरा आल्याच्या कारणावरून बुधवारी सकाळी नातेवाइकांत तुफान हाणामारी झाली. तिरडीच्या काठ्यांनी डोक्यावर वार करण्यात आल्याने इचलकरंजी येथील चौघेजण जखमी झाले.
जखमींमध्ये विकास गेजगे, निवास गेजगे, सुनंदा पारसे आणि पूजा पारसे यांचा समावेश आहे.
मयत अलका करडे यांच्या रक्षाविसर्जनावेळी दोन्ही बाजूंत वाद वाढताच काठ्या काढून मारहाण झाली. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असून, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोल्हापुरात रक्षाविसर्जनावेळी तिरडीच्या काठ्यांनी मारहाण; स्मशानभूमीत धुमश्चक्री
|