बातम्या
शिळं अन्न दिल्याच्या वादातून मारहाण; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा
By nisha patil - 11/7/2025 6:47:08 PM
Share This News:
शिळं अन्न दिल्याच्या वादातून मारहाण; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा
आमदार निवास कँटीनमध्ये शिळं अन्न दिल्याच्या कारणावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात IPC कलम 352, 115(2) आणि 3(5) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.समाजमाध्यमांवरील व्हिडीओ आणि स्थानिक चौकशीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पोलिसांकडून या घटनेचा अहवाल विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवला जाणार आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यास त्याला सामोरे जाईन, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
शिळं अन्न दिल्याच्या वादातून मारहाण; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा
|