बातम्या

वाद्यगायनात, भक्तिगीतांत दुमदुमला सौंदत्ती – देव मामा पुणेकरांनी सजवली पौर्णिमेची वारी

Beautiful in instrumental music and devotional songs


By nisha patil - 9/9/2025 11:06:20 AM
Share This News:



वाद्यगायनात, भक्तिगीतांत दुमदुमला सौंदत्ती – देव मामा पुणेकरांनी सजवली पौर्णिमेची वारी

रेणुका मातेचे निस्सीम भक्त देव मामा पुणेकर यांचा सौंदत्ती दौरा

बेळगाव / निपाणी :- रेणुका मातेचे निस्सीम भक्त श्री महादेव पुणेकर उर्फ देव मामा हे दर पौर्णिमेला सौंदत्ती येथील रेणुका देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतात, आईची ओटी भरतात तसेच लिंब नेसण्याची प्रथा भावपूर्वक पार पाडतात. वाद्य, गायन व भक्तिगीतांच्या गजरात हा सोहळा ते आणि त्यांचे सहकारी भक्त नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा करतात.

याही पौर्णिमेला अक्कोळ (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथून देव मामा पुणेकर व त्यांचे सहकारी भक्तगण सौंदत्ती येथे गेले होते. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री विकास पुणेकर, युवराज बाचणकर, सतीश माळी, सुरेश सव्वाशे, प्रल्हाद सव्वाशे, महादेव नाईक, संजीवनी खोडे, सिंधू भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

रेणुका मातेवरील निष्ठा, भक्ती आणि जल्लोष या माध्यमातून देव मामा पुणेकर यांनी पुन्हा एकदा आईच्या भक्तांचा सोहळा अविस्मरणीय केला.


वाद्यगायनात, भक्तिगीतांत दुमदुमला सौंदत्ती – देव मामा पुणेकरांनी सजवली पौर्णिमेची वारी
Total Views: 126