बातम्या
आई झाली... पण जग सोडून गेली!
By nisha patil - 6/23/2025 7:48:05 PM
Share This News:
आई झाली... पण जग सोडून गेली!
सिझेरियननंतर अतिरक्तस्रावामुळे चंद्रभागा पाटील यांचे निधन
आसगाव (ता. पन्हाळा) येथील चंद्रभागा प्रवीण पाटील (वय २२) यांचा कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाला. त्यांनी एका मुलीला जन्म दिला मात्र तिच्या आयुष्यातील पहिल्याच क्षणी नियतीने तिची आई हिरावून घेतली. चंद्रभागा व प्रवीण यांचा प्रेमविवाह होऊन नुकताच पहिला वाढदिवस साजरा झाला होता. कळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये हलवले होते. डॉक्टरांनी प्रयत्न केले असले तरी शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
आई झाली... पण जग सोडून गेली!
|