बातम्या

आजरा साखरच्या व्हा. चेअरमन पदी अनिल फडके यांची बिनविरोध निवड

Become a member of Ajra Sakhar Anil Phadke elected unopposed as chairman


By Administrator - 10/3/2026 3:57:57 PM
Share This News:



आजरा साखरच्या व्हा. चेअरमन पदी अनिल फडके यांची बिनविरोध निवड

आजरा(हसन तकीलदार ) :- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी अनिल फडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आज झालेल्या  संचालक मंडळ सभेमध्ये रिक्त असलेल्या व्हा. चेअरमन या पदावर कारखान्याचे संचालक श्री. अनिल भिमा फडके रा. सुळे यांची बिनविरोध निवड झाली. सदरची सभा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग कोल्हापुर यांचे प्रतिनिधी जी.जी. मावळे, यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. व्हाईस चेअरमन पदासाठी अनिल फडके यांचे नांव माजी उपाध्यक्ष सुभाष गणपतराव देसाई यांनी सुचविले त्यास संचालक मारूती जानबा घोरपडे यांनी अनुमोदन दिले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई, यांनी आपल्या मनोगतात नाम. हसन मुश्रीफसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ एकमताने काम करीत असुन यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून कारखाना यशस्वीपणे चालविणेसाठी प्रयत्नशील राहतील असे सांगीतले तर माजी व्हा. चेअरमन  सुभाष देसाई यांनी नाम.हसन मुश्रीफसाहेब व संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचारी यांनी व्हाईस चेअरमन पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्याबददल आभार व्यक्त केले. नुतन उपाध्यक्ष श्री. अनिल फडके यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी वेळ देवुन काम करणार असल्याचे सांगीतले.

यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक तथा बँक प्रतिनिधी  सुधीरभाऊ देसाई, कारखान्याचे संचालक विष्णु केसरकर, उदयसिंह पोवार, मधुकर देसाई, दिपक देसाई,  रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे),  शिवाजी नांदवडेकर,राजेश जोशीलकर, संभाजी दत्तात्रय पाटील,गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, हाजीरशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई व कार्यकारी संचालक  संभाजी सावंत, प्रादेशिक ऑफीसचे कार्यालय अधिक्षक  दिगंबर पाटील व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.


आजरा साखरच्या व्हा. चेअरमन पदी अनिल फडके यांची बिनविरोध निवड
Total Views: 179