शैक्षणिक

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बेड वेडिंग मार्गदर्शन शिबिर संपन्न

Bed Wedding Guidance Camp Completed


By nisha patil - 5/27/2025 9:27:02 PM
Share This News:



डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बेड वेडिंग मार्गदर्शन शिबिर संपन्न

कोल्हापूर, दि. २७ : जागतिक बेड वेटिंग डे निमित्त कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुलांमध्ये अंथरूण ओले करण्याच्या समस्येबाबत आयोजित या शिबिरात १०० पेक्षा अधिक पालकांनी सहभाग घेतला.

शिबिरात बालरोग व मूत्ररोग तज्ज्ञांनी उपस्थित मुलांची वैद्यकीय तपासणी करून पालकांना आवश्यक मार्गदर्शन केले. अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली यांनी नॉक्टर्नल एन्युरेसिस या समस्येवर मार्गदर्शन करताना सांगितले की, पाचव्या वर्षानंतरही ही समस्या कायम राहिल्यास त्वरित उपचार आवश्यक असतात. पालकांनी घाबरून न जाता मुलांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, ऋतुराज व पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. राजश्री माने, डॉ. मोहन पाटील, डॉ. देवयानी कुलकर्णी यांच्यासह हॉस्पिटलचे अधिकारी, कर्मचारी, पालक व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बेड वेडिंग मार्गदर्शन शिबिर संपन्न
Total Views: 78