बातम्या
ग्रंथांशी मैत्री करा, व्यसनांना ठाम नकार द्या! मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा पुस्तकांच्या पानांशी मैत्री करा!
By nisha patil - 9/26/2026 8:17:38 PM
Share This News:
ग्रंथांशी मैत्री करा, व्यसनांना ठाम नकार द्या! मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा पुस्तकांच्या पानांशी मैत्री करा!
सैनिक टाकळी : प्रतिनिधी वाचन संस्कृती रुजविण्यासह युवकांना व्यसनमुक्ती, सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी राजा छत्रपती मंडळ, सैनिक टाकळीच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या ३६ वर्षांच्या सामाजिक वाटचालीतील या उपक्रमाला ग्रामस्थ, युवक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती विकसित करा. मानसिक तणाव किंवा अडचणी मनात साठवून न ठेवता पालक, शिक्षक आणि विश्वासातील व्यक्तींशी संवाद साधा. “एक अपयश म्हणजे संपूर्ण आयुष्याचे अपयश नव्हे,” असा सकारात्मक संदेश देत व्यसनांपासून दूर राहून वाचन, खेळ, कला आणि कौशल्यविकासाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, अकिवाट येथील श्री हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ घेतला. उपस्थित ग्रामस्थांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला.राजा छत्रपती मंडळाने गेल्या ३६ वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा जपली आहे. यंदाच्या उपक्रमातून वाचन, विचार आणि निरोगी जीवनशैलीच्या माध्यमातून सकारात्मक समाजनिर्मितीचा संदेश देण्यात आला.
यावेळी मंडळाचे शामराव पाटील, अध्यक्ष आदर्श पाटील, सौरभ पाटील, अमित पाटील, विजय पाटील, अनिल पाटील, अक्षय पाटील, बबन पाटील, दत्तात्रय पाटील, संयोग तवंदकर यांच्यासह विद्यार्थिनी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथांशी मैत्री करा, व्यसनांना ठाम नकार द्या! मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा पुस्तकांच्या पानांशी मैत्री करा!
|