बातम्या
बाळूमामा मंदिरातील गैरकारभाराविरोधात घंटानाद मोर्चा; ट्रस्टींच्या हकालपट्टीची मागणी
By nisha patil - 7/11/2025 5:11:26 PM
Share This News:
बाळूमामा मंदिरातील गैरकारभाराविरोधात घंटानाद मोर्चा; ट्रस्टींच्या हकालपट्टीची मागणी
आदमापूर (ता. हाटकणंगले) येथील संत बाळूमामा मंदिरातील गैरकारभार आणि ट्रस्टींच्या मनमानीविरोधात संतप्त भाविकांनी आवाज उठवला आहे. ट्रस्टींच्या हकालपट्टीसाठी तसेच देवस्थान प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ९ नोव्हेंबर रोजी मुधाळ तिट्टा ते बाळूमामा देवालयापर्यंत घंटानाद मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाची माहिती हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते-कुऱ्हाडे, महांतेश नाईक, संजय शेंडे, सागर पाटील आणि संतोष दाईगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाविकांनी सांगितले की, मंदिरातील लेखापरीक्षणात अनेक त्रुटी आढळल्या आहेत. ऊस बिले, भंडारा, बकरी, धान्य यामध्ये अनागोंदी कारभार सुरू असून, ट्रस्टमध्ये नातेवाईकवाद वाढला आहे. स्थानिक आमदारांचा हस्तक्षेप आणि धर्मादाय आयुक्तांचा पक्षपातीपणा हेही गंभीर मुद्दे असल्याचे त्यांनी नमूद केले.
बाळूमामा हे अखंड महाराष्ट्राचे दैवत असून, मंदिर प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात आता भाविक रस्त्यावर उतरणार आहेत.
बाळूमामा मंदिरातील गैरकारभाराविरोधात घंटानाद मोर्चा; ट्रस्टींच्या हकालपट्टीची मागणी
|