बातम्या
कागलच्या महामार्ग कामाची भैय्या माने यांच्याकडून पाहणी; दर्जाबाबत दिल्या सूचना!
By nisha patil - 10/24/2026 10:29:55 PM
Share This News:
कागलच्या महामार्ग कामाची भैय्या माने यांच्याकडून पाहणी; दर्जाबाबत दिल्या सूचना!
कागल येथे सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या कामाचा दर्जा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा पाइपलाइन आणि गटार व ड्रेनेज व्यवस्थेचा आढावा घेत त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
महामार्गाच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांची गैरसोय टाळली जावी, यासाठी पर्यायी वाहतूक मार्गांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना माने यांनी दिल्या. तसेच कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक आणि बॅरिकेड्स लावून वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्याच्या कामादरम्यान पाणीपुरवठा पाइपलाइनचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यासह गटार व ड्रेनेज व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर त्यांनी भर दिला. पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महामार्गाचे काम दर्जेदार आणि टिकाऊ होण्यासाठी निर्धारित निकषांनुसार गुणवत्तापूर्ण साहित्याचा वापर करावा आणि काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देशही माने यांनी दिले.
या पाहणीवेळी नगरसेवक अमित पिष्टे, सुशांत कालेकर, कागल नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील, सुपरवायझर विवेक सोनी यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
कागलच्या महामार्ग कामाची भैय्या माने यांच्याकडून पाहणी; दर्जाबाबत दिल्या सूचना!
|