विशेष बातम्या

मा. भरत (नाना) पाटील यांचा भव्य सत्कार – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक पदी निवडीबद्दल गौरव

Bharat Nana Patil felicitated

By nisha patil - 5/28/2025 6:21:12 PM
Share This News:

मा. भरत (नाना) पाटील यांचा भव्य सत्कार – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक पदी निवडीबद्दल गौरव

सातारा जिल्ह्याचे भाजपचे प्रदेश सचिव मा. भरत (नाना) पाटील यांची केंद्रीय इस्पात मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

कोल्हापुरातील छ. शिवाजी पेठ येथील मा. महेश बाळासाहेब जाधव जनसंपर्क कार्यालयात हा सत्कार समारंभ पार पडला. प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते मा. भरत पाटील यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास हेमंत आराध्ये, गायत्री राऊत, संतोष भिवटे, राजू मोरे, गिरीश साळोखे, सुनील पाटील, रवी किरण गवळी, संग्राम जरग, सचिन पवार, विश्वास पवार, भरत काळे, अमोल पालोजी, प्रसन्न शिंदे, राहुल पाटील, सागर जाधव, श्रीकांत करंबे, सतीश अंबर्डेकर, धनश्री तोडकर, माधुरी कुलकर्णी, असावरी जुगदार, सरिताताई हारुगले व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

— मा. महेश बाळासाहेब जाधव जनसंपर्क कार्यालय, कोल्हापूर

मा. भरत (नाना) पाटील यांचा भव्य सत्कार – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक पदी निवडीबद्दल गौरव
Total Views: 97