बातम्या

एव्हरेस्टच्या शिखरावर भरतनाट्यमची नृत्यगंगा!

Bharatanatyam dance group on the summit of Everest


By nisha patil - 11/13/2025 3:11:20 PM
Share This News:



एव्हरेस्टच्या शिखरावर भरतनाट्यमची नृत्यगंगा!

तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या नृत्यांगनांनी जगातील सर्वोच्च शिखरावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवला आहे. नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील आणि शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज, प्रांजल दळवी यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) तसेच काला पत्थर (१८,२०० फूट) येथे भरतनाट्यम सादर करून नवा इतिहास रचला.

थेंगबोचे मॉनेस्ट्री येथे गणपती स्तुती, काला पठार येथे शिव श्लोक तर एव्हरेस्ट बेस कॅम्पवर संयोगिता पाटील यांनी श्रीराम स्तुती श्लोक सादर केला. गोठवणाऱ्या थंडीत, उणे आठ अंश तापमानात, आणि सलग बर्फवृष्टीच्या परिस्थितीतही या नृत्यांगनांनी भारतीय नृत्यकलेची ओळख एव्हरेस्टपर्यंत नेली — हीच खरी संस्कृतीची शिखरयात्रा!


एव्हरेस्टच्या शिखरावर भरतनाट्यमची नृत्यगंगा!
Total Views: 39