बातम्या
भारती माने यांचा आठ नंबर वार्डात जल्लोषात अर्ज दाखल
By nisha patil - 11/14/2025 6:11:07 PM
Share This News:
भारती माने यांचा आठ नंबर वार्डात जल्लोषात अर्ज दाखल
युवक क्रांती महाआघाडीचा दमदार शक्तिप्रदर्शन; समर्थकांची उत्स्फूर्त उपस्थिती..
प्रतिनिधी - किशोर जासूद युवक क्रांती महाआघाडीच्या वतीने आठ नंबर वार्डातून उमेदवार सौ. भारती अंकुश माने यांनी मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना समर्थकांची उत्स्फूर्त गर्दी दिसून आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या उत्साहात माने यांनी उमेदवारी प्रक्रिया पूर्ण केली.
स्थानिक कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आठ नंबर वार्डात युवक क्रांती महाआघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
भारती माने यांचा आठ नंबर वार्डात जल्लोषात अर्ज दाखल
|