बातम्या
भिकेकोनाळ अंगणवाडीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.....
By nisha patil - 6/28/2026 10:24:11 PM
Share This News:
भिकेकोनाळ अंगणवाडीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.....
दोडामार्ग : ✒️गवस शुभम राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत भिकेकोनाळ येथील अंगणवाडी केंद्रात लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. अंगणवाडी सेविका सौ. आदिती देसाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. विठ्ठल नाईक, सौ. किशोरी नाईक तसेच आशा सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमात परिसरातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. तसेच पालकांना पोलिओमुक्त भारत अभियानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
पोलिओसारख्या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना पोलिओचे डोस देणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अंगणवाडीतील बालके, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
भिकेकोनाळ अंगणवाडीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.....
|