बातम्या

कोल्हापुरात ११ ते १६ एप्रिल दरम्यान ‘भीम फेस्टिवल आयोजन..

Bhim Festival to be held in Kolhapur from April 11 to 16


By Administrator - 11/4/2025 4:17:53 PM
Share This News:



कोल्हापुरात ११ ते १६ एप्रिल दरम्यान ‘भीम फेस्टिवल आयोजन..

’ स्वराज्य तालीम मंडळाच्या वतीने ऐतिहासिक मिरवणुकीसह विविध कार्यक्रम

स्वराज्य तालीम मंडळ, संयुक्त राजेंद्र नगर (स्वराज्य चौक) यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दिनांक ११ एप्रिल ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान ‘भीम फेस्टिवल २०२५’ मोठ्या उत्साहात आणि प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये उद्घाटन सोहळा, शाहिरी जलसा, शैक्षणिक स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, ‘विद्यार्थी दत्तक योजना’, समाजगौरव पुरस्कार समारंभ तसेच ऐतिहासिक देखाव्यांसह भव्य मिरवणूक यांचा समावेश आहे.

प्रमुख पाहुण्यांमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, समाजकल्याण आयुक्त सचिन साळे, डीवायएसपी अजित टिके, अॅड. विशाल माने (हायकोर्ट), इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांची उपस्थिती असणार आहे.

कार्यक्रमाचे नियोजन पुढीलप्रमाणे:

११ एप्रिल: भीम फेस्टिवलचे उद्घाटन, शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक व महात्मा फुले यांचे फोटो पूजन (संध्याकाळी ७.०० वा)

१३ एप्रिल: सामान्य ज्ञान परीक्षा व मनोरंजनात्मक स्पर्धा

१४ एप्रिल: सायंकाळी ७ वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, शालेय साहित्य वाटप, समाजगौरव पुरस्कार आणि बक्षीस वितरण

१६ एप्रिल: सायंकाळी ५.०० वाजता ऐतिहासिक देखाव्यासह भव्य मिरवणूक सोहळा


या कार्यक्रमासाठी कोल्हापूरातील सर्व भीम अनुयायांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वराज्य तालीम मंडळाच्या जयंती समितीतर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सुखदेव बुध्याळकर, प्रविण बनसोडे, अमित नागहीले, सुरेश आठवले, पंकज आठवले, उमेश भोसले, शिवराम बुध्याळकर, चंद्रकांत शिवशरण, रंगनाथ शिवशरण, अशोक शिवशरण, हर्षद गायकवाड, सौरभ बुधाळकर, शुभम शिवशरण, भारत प्रक्षाळे, वैभव बुध्याळकर, कृष्णा माने, रवी भोपळे आदी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेत आहेत.


कोल्हापुरात ११ ते १६ एप्रिल दरम्यान ‘भीम फेस्टिवल आयोजन..
Total Views: 100