बातम्या
कोल्हापुरात भिमा नवरात्री नवरंग रासदांडिया कार्यक्रम...
By nisha patil - 9/29/2025 4:40:08 PM
Share This News:
कोल्हापुरात भिमा नवरात्री नवरंग रासदांडिया कार्यक्रम...
तरूणाईच्या उत्साहात चार तासांचा रंगतदार सोहळा
नवरात्रोत्सवानिमित्त रामकृष्ण हॉलमध्ये भिमा नवरात्री नवरंग रासदांडिया कार्यक्रम रंगला. ए.जी.व्हेंचर प्रस्तुत या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांसह मान्यवर उपस्थित होते.
सुमारे चार तास चाललेल्या या सोहळ्यात ५०० तरूण-तरूणींचा सहभाग होता आणि २ हजारहून अधिक नागरिकांनी प्रेक्षक म्हणून उपस्थिती लावली. १५ वर्षावरील गटात सर्वोत्तम ग्रुप म्हणून सनेडो ग्रुपला २० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षिस खेलैया ग्रुपला १० हजार रुपये. लहान मुलांना सायकल आणि खेळणी बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमासाठी १ लाख रुपयांपर्यंत बक्षिसे जाहीर करण्यात आली.
कोल्हापुरात भिमा नवरात्री नवरंग रासदांडिया कार्यक्रम...
|