बातम्या
भुदरगड हादरलं! २२ वर्षीय तरुणीचा दरीत मृतदेह; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात!
By nisha patil - 11/10/2026 2:54:47 PM
Share This News:
भुदरगड हादरलं! २२ वर्षीय तरुणीचा दरीत मृतदेह; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात!
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तरन्नुम बशीर नाईक वय २२ या तरुणीचा मृतदेह दरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तरन्नुम ही अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी होती. ती शुक्रवारपासून बेपत्ता असल्याने तिच्या कुटुंबीयांनी भुदरगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात संशयित प्रियकर श्रीपाद दिनकर वडर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरन्नुमचे लग्न अन्यत्र ठरल्याने वाद निर्माण झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, तरुणीचा मृतदेह गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी पुढील तपासणीसाठी कोल्हापूर येथे नेण्याच्या सूचना दिल्या. मृतदेहाचे पारदर्शक पद्धतीने शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत मृत तरुणीच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
भुदरगड हादरलं! २२ वर्षीय तरुणीचा दरीत मृतदेह; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात!
|