राजकीय

मंगळवारी दिनांक १७ फेब्रुवारीला भुदरगड दणाणणार! शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; प्रशासनाला धारेवर धरणार

Bhudargad will be rocked on Tuesday February 17 Farmers protest Will hold the administration to account


By nisha patil - 2/14/2026 11:44:57 PM
Share This News:



मंगळवारी दिनांक १७ फेब्रुवारीला भुदरगड दणाणणार! शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; प्रशासनाला धारेवर धरणार

भुदरगड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विविध शेतकरी संघटनांच्या वतीने मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी भुदरगडमध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक येथून प्रांत कार्यालयावर हा मोर्चा धडक देणार असून, याचे आयोजन करण्यात आले आहे.

सीएसआर निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या कृषी फवारणी पंप प्रकरणात झालेल्या कारवाई विरोधात तसेच पंचायत समिती निवडणुकीदरम्यान मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शासनाने जप्त केलेले तीस लाखाचे कृषी फवारणी पंप तत्काळ शेतकऱ्यांना वितरित करावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येणार आहे.
“शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा आयोजकांकडून देण्यात आला आहे.

या मोर्चात सुमारे ३००० ते ५००० शेतकरी व नागरिक सहभागी होणार असून, मोर्चा शांततेत पण ठाम भूमिका घेऊन काढण्यात येणार असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष राहुल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


मंगळवारी दिनांक १७ फेब्रुवारीला भुदरगड दणाणणार! शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा; प्रशासनाला धारेवर धरणार
Total Views: 9