बातम्या
भुपाल शेटे यांचा महानगरपालिकेवर गंभीर आरोप!
By nisha patil - 10/15/2025 3:02:44 PM
Share This News:
भुपाल शेटे यांचा महानगरपालिकेवर गंभीर आरोप!
कोल्हापूर : माजी उपमहापौर भुपाल महिपती शेटे यांनी कुष्ठरोगी बांधवांच्या रु.५.१३ लाख अनुदान थकबाकीबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे.
त्यांनी ठेकेदार साईप्रसाद वराळे याला कसबा बावडा येथे काम न करता बनावट बिलाद्वारे रु.७२ लाखाहून अधिक रक्कम दिल्याचा आरोप केला.
शेटे यांनी इशारा दिला की, “चार दिवसांत अनुदान रक्कम दिली नाही, तर कुष्ठरोगी बांधवांना घेऊन महापालिकेच्या दारात आमरण उपोषण करू.”
भुपाल शेटे यांचा महानगरपालिकेवर गंभीर आरोप!
|