बातम्या
पाणी नाही तर रक्त वाहील’ म्हणणारे भुट्टो नरमले –
By nisha patil - 7/5/2025 4:21:10 PM
Share This News:
पाणी नाही तर रक्त वाहील’ म्हणणारे भुट्टो नरमले –
संवाद हवा म्हणत शांततेच्या मार्गावर येण्याचे केले आवाहन
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेत सिंधू जलकरार स्थगित केला आहे. या निर्णयानंतर भारताला धमकी देणारे पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आता शांततेच्या मार्गावर येण्याचं आवाहन करत आहेत.नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना त्यांनी भारताला ‘मूठ बंद करून नव्हे तर उघड्या हातानं यावं’ असं सांगितलं. तसेच दोन्ही देशांनी पुराव्याच्या आधारावर संवाद साधावा, असंही त्यांनी नमूद केलं.
पाणी नाही तर रक्त वाहील’ म्हणणारे भुट्टो नरमले –
|