विशेष बातम्या
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन – आरोग्य व पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश
By nisha patil - 3/6/2025 6:28:41 PM
Share This News:
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन – आरोग्य व पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश
कोल्हापूर (ता.न्यूज) – जागतिक सायकल दिनानिमित्त फिटनेस आयकॉन अक्षयकुमार फॅन्स क्लब आणि कोल्हापूर सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात आरोग्यविषयक जनजागृतीसह पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
या प्रसंगी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रकाश शारबिद्रे यांचा शाल व छत्रपती शिवाजी महाराज यांचे सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
रॅलीमध्ये अध्यक्ष अनिल शिंदे, राम कारंडे तसेच कोल्हापूरमधील विविध सायकलप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली पार पडली.
कार्यक्रमात उपस्थितांनी "सायकल चालवा, आरोग्य सांभाळा" तसेच "सायकल चालवा, प्रदूषण टाळा" अशा घोषणांद्वारे जनतेमध्ये जागरूकतेचा संदेश दिला.
हा उपक्रम नागरिकांमध्ये पर्यावरण स्नेही वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन – आरोग्य व पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश
|