बातम्या
खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल; कामाचे तास वाढणार
By nisha patil - 8/27/2025 4:06:57 PM
Share This News:
खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल; कामाचे तास वाढणार
राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स आणि खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकार कामाचे तास ९ वरून १० करण्याच्या तयारीत आहे. यासाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापने (रोजगार नियमन व सेवा अटी) अधिनियम, २०१७ मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चिला गेला.
कामगार विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावात कामाचे तास, विश्रांतीची वेळ, ओव्हरटाईम आणि कमाल कामाच्या तासांमध्ये वाढ करण्याचे महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. मात्र, मंत्रिमंडळाने काही तरतुदींवर अधिक स्पष्टीकरण मागितल्याने निर्णय सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे.
नव्या प्रस्तावानुसार, दिवसाचे नियमित कामाचे तास १० असतील, सलग ६ तासांनंतर विश्रांती मिळेल, तर ओव्हरटाईमसह दिवसाची कमाल मर्यादा १२ तासांपर्यंत वाढवली जाणार आहे. तातडीच्या कामांच्या परिस्थितीत ही मर्यादाही लागू राहणार नाही.
राज्य सरकारकडून होणाऱ्या या बदलामुळे खासगी आस्थापनांमधील लाखो कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत मोठा फरक पडणार आहे.
खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल; कामाचे तास वाढणार खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल; कामाचे तास वाढणार
|