बातम्या

परदेशवारी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कोल्हापुरातच मिळणार ‘यलो फिव्हर’ची लस

Big good news for those traveling abroad


By nisha patil - 11/20/2026 3:45:49 PM
Share This News:



परदेशवारी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कोल्हापुरातच मिळणार ‘यलो फिव्हर’ची लस

 

परदेशात प्रवास करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात आता ‘यलो फिव्हर’ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून या केंद्रासाठी आवश्यक परवानगीची प्रक्रिया आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

या केंद्रासाठी यलो फिव्हर लसींचा पुरवठा केंद्र शासनामार्फत केला जाणार आहे. त्यामुळे यलो फिव्हरचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी मुंबई किंवा अन्य शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. कोल्हापुरातच ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा वेळ, प्रवास खर्च आणि गैरसोय कमी होणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये यामुळे महत्त्वाची भर पडणार आहे.


परदेशवारी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कोल्हापुरातच मिळणार ‘यलो फिव्हर’ची लस
Total Views: 9