विशेष बातम्या
गोकुळ दूध संघाच्या अनुदान योजनेत मोठी वाढ...
By nisha patil - 7/26/2025 2:47:50 PM
Share This News:
गोकुळ दूध संघाच्या अनुदान योजनेत मोठी वाढ...
जातिवंत म्हैस खरेदीसाठी अनुदानात ऐतिहासिक वाढ
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांनी २० लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प करत दुग्ध व्यवसायाला बळकटी देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. संघाच्या २३ जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध उत्पादकांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदान योजनांमध्ये ऐतिहासिक वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघाचे चेअरमन ना. नविद मुश्रीफ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व सुधारित योजनांमुळे तरुण वर्गही दुग्ध व्यवसायाकडे वळेल असा विश्वास आहे.
जातिवंत म्हैस खरेदीसाठी अनुदानात ऐतिहासिक वाढ
मुऱ्हा म्हैससाठी अनुदान:
₹40,000 वरून ₹50,000 करण्यात आले आहे. यामध्ये –
▪️ ₹10,000 – वाहतूक भाडे
▪️ ₹15,000 – गोठ्यात वासरू झाल्यावर
▪️ ₹25,000 – तीन वर्षांनंतर अदा
मेहसाणा व जाफराबादी म्हैससाठी अनुदान:
₹35,000 वरून ₹45,000 करण्यात आले.याशिवाय वासरू संगोपन अनुदान, सचिव कमिशन आणि फर्टीमिन प्लस या सर्व योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून दूध उत्पादन वाढीस गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गोकुळ दूध संघाच्या अनुदान योजनेत मोठी वाढ...
|