विशेष बातम्या

कोल्हापूरमध्ये दिव्यांग सेवेसाठी मोठा पुढाकार!

Big initiative for disabled services in Kolhapur


By nisha patil - 11/21/2025 3:17:10 PM
Share This News:



कोल्हापूरमध्ये दिव्यांग सेवेसाठी मोठा पुढाकार!

कोल्हापूर: आज कोल्हापूरच्या महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित मोफत दिव्यांग शिबिराला भेट दिली. दिव्यांग बांधवांसाठी मॉड्यूलर हात-पाय, कुबड्या आणि कॅलिपरचे मोफत मोजमाप करताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मन खरंच भावूक झाले.

तांत्रिक मोजमापानंतर ६० दिवसांत सर्व उपकरणे वितरित केली जाणार आहेत.
लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या आयुष्यात असा छोटासा हातभार लावता येत आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे.

या उपक्रमाचे विशेष श्रेय जाते  कोल्हापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकाराला.

कार्यक्रमाला कोल्हापूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष आदिल फरास, शिवसेना समन्वयक सत्यजित कदम, आसिफ फरास, बाबा जांभळे, प्रदिप चव्हाण, ॲड. इंद्रजित चव्हाण, शांतिजीत कदम, व्हिक्टर बोर्जस, करण भिंगार्डे, विजेंद्र चव्हाण, सोहन पाटील, अजिंक्य जांभळे, सौरभ पोवार, विघ्नेश आरते, पुजा साळोखे, शोभना खामकर, सतिशदादा कांबळे, प्रकाश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमात रोटरी क्लब ऑफ खडकी, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, जॉन फर्नांडिस, शितल तेजवाणी, विनीत भाटिया, वंदना जैन, मंजु प्रसाद, सुधा प्रसाद यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शांतिजीत कदम यांनी केले.


कोल्हापूरमध्ये दिव्यांग सेवेसाठी मोठा पुढाकार!
Total Views: 27