बातम्या
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! २७ सप्टेंबरला रविवारीही बँका सुरू राहणार
By nisha patil - 9/24/2026 3:36:20 PM
Share This News:
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! २७ सप्टेंबरला रविवारीही बँका सुरू राहणार
-
बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी...२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशव्यापी बँक संपाची हाक देण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी २७ सप्टेंबर रोजी रविवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आठवड्यातून पाच दिवस कामकाजासह पेन्शन सुधारणा, समान महागाई भत्ता आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय अशा विविध मागण्यांसाठी तीन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे.
विशेष म्हणजे हा संप ३० सप्टेंबरच्या अर्ध-वार्षिक लेखा-समापनाच्या काळात होत असल्याने बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका २७ सप्टेंबरला नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे सांगितले आहे. आरबीआयनेही बँक शाखा, कार्यालये आणि करन्सी चेस्ट कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे.
दरम्यान, संपाच्या काळात ग्राहकांनी एटीएम, यूपीआय, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, तसेच बीसी पॉईंट्सचा वापर करावा, असा सल्ला बँकांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक बँकिंग व्यवहार असल्यास ते संपापूर्वीच पूर्ण करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! २७ सप्टेंबरला रविवारीही बँका सुरू राहणार
|