बातम्या
मच्छीमारांसाठी मोठी बातमी! २४ योजनांचे अर्ज आता ऑनलाईन; अनुदान थेट खात्यात!
By nisha patil - 11/13/2026 7:48:44 PM
Share This News:
मच्छीमारांसाठी मोठी बातमी! २४ योजनांचे अर्ज आता ऑनलाईन; अनुदान थेट खात्यात!
मच्छीमार आणि मत्स्यव्यावसायिकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच मासेमारी परवानाही आता ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे. राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’अंतर्गत महाडीबीटी २.० पोर्टलवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एकूण २८ योजनांना मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी २४ योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
विशेष म्हणजे, आता लाभार्थ्यांना ऑफलाईन कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. विविध शासकीय डेटाबेसच्या माध्यमातून माहितीची स्वयंचलित पडताळणी होणार असून, मंजूर अनुदान थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाणार आहे. संबंधित प्रमाणपत्रेही ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, कोल्हापूरच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात यासाठी स्वतंत्र सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ऑनलाईन अर्ज करताना अडचण आल्यास या कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके यांनी केले आहे.a
मच्छीमारांसाठी मोठी बातमी! २४ योजनांचे अर्ज आता ऑनलाईन; अनुदान थेट खात्यात!
|