बातम्या

आसाममध्ये तेलाचा मोठा शोध! राज्य सरकारची थेट हिस्सेदारी..

Big oil discovery in Assam! State government has direct stake


By nisha patil - 7/17/2025 3:17:38 PM
Share This News:



आसाममध्ये तेलाचा मोठा शोध! राज्य सरकारची थेट हिस्सेदारी..

 नामरूप बोरहाट-१ विहिरीत सापडले हायड्रोकार्बन, आसाम ठरणार थेट तेल उत्पादक राज्य

आसामच्या दिब्रुगढ जिल्ह्यातील नामरूप येथील बोरहाट-१ विहिरीत हायड्रोकार्बन सापडले असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी दिली. या शोधामुळे आसाम थेट तेल उत्पादन करणारे पहिले राज्य सरकार ठरणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

हायड्रोकार्बन हे खनिज तेलाचे संयुग असून, यात हायड्रोजन आणि कार्बनचे अंश असतात. यामुळे खनिज तेल सापडण्याची शक्यता वाढते. राज्य सरकारची या विहिरीत थेट हिस्सेदारी असल्यामुळे आसामच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे.


आसाममध्ये तेलाचा मोठा शोध! राज्य सरकारची थेट हिस्सेदारी..
Total Views: 154