बातम्या
दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पुढील ३ महिने मोफत धान्य
By nisha patil - 11/26/2026 3:21:53 PM
Share This News:
दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पुढील ३ महिने मोफत धान्य
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ न मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुढील तीन महिने मोफत धान्य मिळणार आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता राज्यातील उर्वरित ३३ जिल्ह्यांमधील तब्बल ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. यामध्ये तीन किलो गहू आणि दोन किलो तांदळाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ किंवा एपीएल-डीबीटी योजनेअंतर्गत रोख रक्कम मिळत नसलेल्या शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
आधार सीडिंग पूर्ण असलेल्या शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून धान्य वितरित केले जाणार आहे. तर इतर लाभार्थ्यांना आधार सीडिंग पूर्ण केल्यानंतर धान्य मिळणार आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या लाखो शेतकरी कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पुढील ३ महिने मोफत धान्य
|