बातम्या

स्मिता सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; दक्षिण शहर संघटिका म्हणून निवड!

Big responsibility of Shiv Sena on Smita Sawant


By nisha patil - 11/16/2026 2:53:12 PM
Share This News:



स्मिता सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; दक्षिण शहर संघटिका म्हणून निवड!

 प्रतिनिधी अजित बोडके शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दक्षिण शहर संघटिका म्हणून स्मिता शरदचंद्र सावंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची, महिला सक्षमीकरणातील योगदानाची आणि पक्षसंघटनेतील निष्ठावंत कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
 

स्मिता सावंत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने काम केले आहे. महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासोबतच गरजू महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी महिला संघटना मजबूत करणे, नव्या महिलांना पक्षाशी जोडणे आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. राजकीय कार्यासोबतच स्मिता फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. महिला, मुली आणि गरजू कुटुंबांसाठी केलेल्या कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली असून त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

आता दक्षिण शहर संघटिका म्हणून मिळालेल्या नव्या जबाबदारीतून महिला संघटन अधिक मजबूत करण्यासह महिलांचे प्रश्न आणि हक्कांसाठी त्या अधिक जोमाने काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्मिता सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 


स्मिता सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; दक्षिण शहर संघटिका म्हणून निवड!
Total Views: 24