शैक्षणिक
टीईटी–एसईटी पेपर फोडकांडात मोठा खुलासा; गायकवाड टोळीची कबुली, आणखी 10 जण अटक
By nisha patil - 11/25/2025 11:09:33 AM
Share This News:
कोल्हापूर : राज्यातील टीईटी आणि एसईटी परीक्षांच्या पेपरफोड प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचा धागा लागला आहे. महेश भगवान गायकवाड या मुख्य सूत्रधारासह त्यांच्या टोळीने चौकशीत पेपर लीक केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून आणखी
चौकशीतून उघड झाले की गायकवाड टोळीने टीईटीचे २५-३० तर एसईटीचे किमान २५ परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका आधीच पुरवल्या होत्या. प्रत्येकीकडून सुमारे ३ लाख रुपये आकारल्याची माहिती समोर आली असून एकूण ५० ते ६० परीक्षार्थी या रॅकेटच्या जाळ्यात असल्याचा अंदाज आहे.
पेपर मिळवून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये काहीजण आता शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
या प्रकरणाचा तपास डीवायएसपी सुजित क्षीरसागर यांच्या पथकाकडे असून पेपर पुरवणारे, एजंट, परीक्षार्थी तसेच प्रश्नपत्रिका झेरॉक्स करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
टीईटी–एसईटी पेपर फोडकांडात मोठा खुलासा; गायकवाड टोळीची कबुली, आणखी 10 जण अटक
|