बातम्या

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये मोठा घोटाळा?

Big scam in Flipkarts Big Billion Days sale


By nisha patil - 9/25/2025 1:52:09 PM
Share This News:



फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये मोठा घोटाळा?

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलदरम्यान मोठा घोटाळा समोर आला आहे. कमी किंमतीत Apple iPhone खरेदीसाठी हजारो ग्राहकांनी ऑर्डर दिल्या होत्या. मात्र, या ऑर्डर्स फ्लिपकार्टकडून अचानक रद्द करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

ग्राहकांच्या मते, ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर काही तासांतच फ्लिपकार्टने “पेमेंट फेल” किंवा “स्टॉक उपलब्ध नाही” अशा कारणांखाली नोटिफिकेशन पाठवून खरेदी रद्द केली. त्यामुळे लोक सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी याला “Big Billion Scam” असं नाव दिलं आहे.

यंदाच्या सेलमध्ये iPhone 16 आणि iPhone 16 Pro हे मॉडेल्स अत्यंत कमी किंमतीत विक्रीसाठी आणण्यात आले होते. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही सवलत खरी नसून जुना स्टॉक संपवण्यासाठी आणि मार्केटिंग प्रमोशनसाठी हा डाव रचण्यात आला असू शकतो.

ग्राहक म्हणतायत की, “ऑर्डर कन्फर्म झाली, पेमेंट डेबिट झालं… तरी काही तासांनी रद्द झालं. हा प्रकार म्हणजे थेट विश्वासघात आहे.”

दरम्यान, फ्लिपकार्टकडून या संपूर्ण वादावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये मोठा घोटाळा?
Total Views: 76