शैक्षणिक

NEET 2025 निकालात मोठा ट्विस्ट! फक्त 59 हजारांना 500+ गुण, कटऑफ खाली जाणार!

Big twist in NEET 2025 results


By nisha patil - 6/30/2025 5:40:26 PM
Share This News:



NEET 2025 निकालात मोठा ट्विस्ट! फक्त 59 हजारांना 500+ गुण, कटऑफ खाली जाणार!

NEET म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (वैद्यकीय) निकाल जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण लक्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे. यंदाही निकालानंतर अनेक विद्यार्थी व पालकांनी प्रवेशासाठी कटऑफबाबत विविध चर्चा सुरू केल्या आहेत.

विशेष म्हणजे, यंदा 500 हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ 59,503 इतकी आहे. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत खूपच कमी आहे. यामुळे यावर्षीचा वैद्यकीय प्रवेशाचा कटऑफ लक्षणीयरित्या खाली येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

यंदा NEET चा पेपर अतिशय कठीण असल्याचे सर्वच स्तरांवरून मान्य करण्यात आले आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत भीतीचे वातावरण होते. अनेकांना कमी गुण मिळाल्यामुळे प्रवेश मिळणार की नाही, याबाबत संभ्रम होता.

तथापि, सर्वसामान्यपणे कमी गुण मिळाल्यामुळेच यंदा ऑल इंडिया रँक तुलनेत चांगली आल्याचे चित्र समोर आले आहे. यावर्षीचा टॉपरसुद्धा केवळ 686 गुणांवर पहिल्या क्रमांकावर आला आहे
या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सकारात्मक बाब ठरू शकते. कटऑफ खाली येईल अशी स्पष्ट शक्यता असल्याने कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनीदेखील प्रवेश प्रक्रियेबाबत आशा ठेवावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


NEET 2025 निकालात मोठा ट्विस्ट! फक्त 59 हजारांना 500+ गुण, कटऑफ खाली जाणार!
Total Views: 61