ताज्या बातम्या

१ कोटी ४० लाखांची बिले थकीत असुन पाणीपुरवठा सुरुच.....

Bills of 1 crore 40 lakhs are overdue and water supply continues


By nisha patil - 2/13/2025 6:24:16 PM
Share This News:



 शहराजवळच्या गावांमधील काही भाग, कॉलन्या आणि नागरी वसाहतींना आजही महापालिकेकडुन पाणीपुरवठा केला जातोय. ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सुमारे ६ हजार ६०० कुटुंबांना महापालिका दररोज पाणीपुरवठा करते. पाणीपुरवठ्यासाठी कर्मचारी, पाणी मीटर चेक करण्यासाठी मीटर रीडर ही सर्व यंत्रणा महापालिकेचीच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील या जनतेला महापालिकेकडूनच पाणीपुरवठा केला जातोय. 

सद्यस्थितीत या गावांतील नागरिकांकडून महापालिकेचे १ कोटी १२ लाख रुपयांचे पाणी बिल येणे बाकी आहे. त्यावर २८ लाख रुपयांचा विलंब आकार लागू झालाय. ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांकडून १ कोटी ४० लाख ९१ हजार रुपयांचे बिले थकीत आहेत. अधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्या ६ हजार ६०० इतकी असली, तरीदेखील शहरालगतच्या गावांमध्ये महापालिकेच्या पाईपलाईनवर काही बोगस नळ कनेक्शन आहेत. या बोगस नळ कनेक्शनधारकांची संख्यादेखील मोठी असल्याचा दावा केला जातोय.


१ कोटी ४० लाखांची बिले थकीत असुन पाणीपुरवठा सुरुच.....
Total Views: 47