बातम्या
विवेकानंद महाविदयालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
By nisha patil - 2/10/2026 3:35:16 PM
Share This News:
विवेकानंद महाविदयालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
कोल्हापूर दि. 2 : येथील विवेकानंद महाविदयालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा गांधीजींच्या व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी प्राचार्य डॉ.सी.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ.सी.बी.पाटील म्हणाले, महात्मा गांधीजींनी सत्य्, अहिसा, सत्याग्रह, स्वावलंबन, स्वच्छता या चिरकालीन संकल्पना जगासमोर मांडल्या. या तत्वांना महात्मा गांधी यांनी जीवनात खूप महत्व् दिले. धर्मनिरपेक्षता आणि मानवता याचबरोबर संघटितपणा यासाठी गांधीजींची विचारसरणी आजही उपयुक्त आहे.
इतिहास विभागप्रमुख डॉ. अजय पाटील म्हणाले, आजच्या वर्तमान युगातील गांधीजींचे तत्वज्ञान लागू केले तरच माणूस शांततेने जगू शकतो. त्यामुळे मानवी जीवन सुखमय होईल. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यानी जय जवान जय किसान हा नारा देऊन संपूर्ण शेतकऱ्यांना सबल करण्याचे कार्य केले. देशातील गोरगरीबांची सेवा करणे हीच त्याना आदरांजली ठरेल. महात्मा गांधी जयंती स्वच्छता सप्ताह निमित महाविद्यालयाच्या एन.एस.एस. व एन.सी.सी. विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत इतिहास विभागाचे प्रा.सचिन साळवे यांनी केले. आभार राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.समीक्षा फराकटे यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागातर्फे करण्यात आले होते. या प्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ. एकनाथ आळवेकर, प्रा.अभिलाष पाटील, डॉ.दीपक तुपे, डॉ.एच पी पाटील,डॉ कैलास पाटील, डॉ एस एस अंकुशराव, प्रा सौ एस पी पंचभाई, लेफ्टनंट जे आर भरमगोंडा, प्रा रजत चौगुले, डॉ.अभिजीत पाटील, श्री सदानंद दुर्गुळे, वसंत पाटील, सुहास बारवाडे, अनिल खोत, विनायक जाधव, राजू माने तसेच महाविदयालयातील ज्युनिअर, सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व एन.सी.सी. एन.एस.एस.चे विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद महाविदयालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
|