बातम्या
*रोझरी हायस्कुलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी
By nisha patil - 2/10/2026 3:52:22 PM
Share This News:
*रोझरी हायस्कुलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी
*आजरा(हसन तकीलदार):-2 ऑक्टोबर आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. देशात सर्वत्र आज जयंती साजरी केली जात आहे. आजरा येथील रोझरी इंग्लिश हायस्कुल येथेही गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मनवेल बार्देसकर, पर्यवेक्षक विजय केसरकर जेष्ठशिक्षक डॉम्नीक डिसोझा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत अभिवादन केले गेले.
इयत्ता सहावीची विद्यार्थिनी सायमा दरवाजकर हिने आपल्या मनोगतातून गांधीजी आणि शास्त्री यांच्या जीवनाचा परिचय करून दिला तर स्टीफन डिसोझा यांनी आपल्या मनोगतातून "या महान विचारांचा आपल्या जीवनात परिवेश करून त्याची सुरुवात करावी व त्यांच्या मूल्यांचा जीवनात वापर केल्यानेच खरेखुरे अभिवादन ठरेल" अशी भावना व्यक्त करताना उपस्थिताना मार्गदर्शन केले .
आभार व सूत्रसंचालन संयोजिका सौ.प्रणिता होडगे यांनी केले
*रोझरी हायस्कुलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी
|