शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती
By nisha patil - 12/1/2026 4:38:00 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ.श्रीकृष्ण महाजन, रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.संजय चव्हाण, डॉ. कल्याणराव गरडकर, डॉ. कैलास सोनवणे, डॉ.अजित कोळेकर, उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव, गजानन पळसे, डॉ.वैशाली सावंत, डॉ.ज्योती खराडे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती
|