विशेष बातम्या

आमदार ऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Birthday wishes showered on MLA Rituraj Patil


By nisha patil - 1/6/2025 12:51:48 AM
Share This News:



आमदार ऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर / प्रतिनिधी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त व माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरसह राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सकाळपासूनच यशवंत निवास (कसबा बावडा) आणि सायंकाळी साळोखेनगरमधील डी. वाय. पाटील कॉलेज येथे शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

ऋतुराज पाटील यांनी सकाळी डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर कुटुंबीयांनी औक्षण करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील व इतर कुटुंबीय उपस्थित होते.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा, पत्रकारिता आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटी देत शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये राजीव आवळे, के. पी. पाटील, आनंद माने, दीपक चोरगे, मधुकर देसाई, शशांक बावचकर, सचिन चव्हाण, विश्वास पाटील आबाजी, अजित नरके, बाळासाहेब खाडे आदींचा समावेश होता.

तर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, छत्रपती संभाजीराजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगेश कदम, हर्षवर्धन सपकाळ, एकनाथ खडसे, धीरज देशमुख, सौरभ शेट्टी यांसारख्या अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

युवा नेते म्हणून ओळखले जाणारे ऋतुराज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सेल्फीसाठी एकच झुंबड उडाली होती. त्यांच्या विनम्रतेने आणि सर्वसामान्यांशी असलेल्या जवळिकीमुळे ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती लावली होती.


आमदार ऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
Total Views: 103