बातम्या

शासकीयअध्यापक महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिना निमित्त प्रभात फेरीद्वारे रक्तदान जाणिव जागृती

Blood donation awareness campaign through morning

By nisha patil - 9/18/2025 4:39:50 PM
Share This News:

शासकीयअध्यापक महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिना निमित्त प्रभात फेरीद्वारे रक्तदान जाणिव जागृती
 
कोल्हापूर  : येथील श्री महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्यावतीने राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  दिनांक १७ सप्टेंबर  ते  २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरले असून त्या अनुषंगाने महाविद्यालयात सर्वप्रथम रक्तदान जाणीव जागृती निमित्त  प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान ही आपली सामाजिक जबाबदारी असून महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी या जाणिव जागृतीने कार्यरत राहील असे प्राचार्या डॉ. लता पाटील यांनी सांगितले .यावेळी बी.एड.प्रथम वर्ष व व्दितीय वर्षाचे छात्राध्यापक , प्राचार्या डॉ.लता पाटील, आणि अधिव्याख्याते डॉ. अजय साळी ,डॉ.तारसिंग नाईक ,डॉ.गौतम माने ,प्रा. प्रवीण चाकोते व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

शासकीयअध्यापक महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिना निमित्त प्रभात फेरीद्वारे रक्तदान जाणिव जागृती
Total Views: 44