विशेष बातम्या
कै. रामभाऊ (दादा) चव्हाण यांच्या जन्म स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर व आर्थिक मदत कार्यक्रम
By nisha patil - 12/5/2025 2:26:06 PM
Share This News:
कै. रामभाऊ (दादा) चव्हाण यांच्या जन्म स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर व आर्थिक मदत कार्यक्रम
कोल्हापूर (प्रतिनिधी) – कै. रामभाऊ (दादा) चव्हाण यांच्या जन्म स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या औचित्याने कै. रामभाऊ (दादा) चव्हाण फाउंडेशनच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कॅन्सरग्रस्त रुग्णांना फाउंडेशनच्यावतीने धनादेश स्वरूपात आर्थिक मदतही करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
याप्रसंगी भाजपचे प्रदेश सचिव मा. महेश बाळासाहेब जाधव, सुजित भाऊ चव्हाण, अजित चव्हाण, अजित खराडे, वेताळ तालीम मंडळाचे पदाधिकारी, तसेच रामभाऊ (दादा) चव्हाण फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. रामभाऊ (दादा) चव्हाण यांच्या जन्म स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर व आर्थिक मदत कार्यक्रम
|